माशी ग माशी
माशी गं माशी, तू अशी गं कशी ?
उडत फिरते नेहमी विमान जशी.
बंधन नाही गं कुणाचे तुला,
पृथ्वी वरची राणी जशी
एका जागी घर ना गं तुझे
आहे तुझे जगच हे सगळे;
व्यापारा मध्येही तूच पुढे,
कधी चाय-भजी, तर कधी विकती फळे.
तुझ्यासारखी आनंदी कुणी नाही
जिथेही दिसते, नेहमी गाणे गाई.
जगा मध्ये तू कधी एकटी ना राही,
मित्र भाऊ कधी सोडून न जाई.
ढीग कच-याचे आहे जिथे,
माशी देवीची यात्रा भरती
सर्व गडी मंडळी
उत्साहाने सजून फिरती....


Mast
ReplyDeleteछान लेखन...👌
ReplyDelete