माशी ग माशी
माशी गं माशी राम पाडवी (Aug 2014) माशी गं माशी, तू अशी गं कशी ? उडत फिरते नेहमी विमान जशी. बंधन नाही गं कुणाचे तुला, पृथ्वी वरची राणी जशी एका जागी घर ना गं तुझे आहे तुझे जगच हे सगळे; व्यापारा मध्येही तूच पुढे, कधी चाय-भजी, तर कधी विकती फळे. तुझ्यासारखी आनंदी कुणी नाही जिथेही दिसते, नेहमी गाणे गाई. जगा मध्ये तू कधी एकटी ना राही, मित्र भाऊ कधी सोडून न जाई. ढीग कच-याचे आहे जिथे, माशी देवीची यात्रा भरती सर्व गडी मंडळी उत्साहाने सजून फिरती....